माजी महापौर बापू घडामोडे अपघातातून थोडक्यात बचावले

Foto

औरंगाबाद- माजी महापौर भगवान (बापू) घडामोडे हे अपघातातून थोडक्यात बचावले आहे. औरंगाबाद-पूणे मार्गावरील देवगडजवळ त्यांच्या गाडीचे दोन्ही टायर फुटल्याने गाडी थेट दुसऱ्या बाजूला फेकली गेली. सुदैवाने त्यांना अपघातात कुठलीही दुखापत झालेली नाही.

बापू घडामोडे हे शहराचे माजी महापौर आहेत. शनिवारी(ता.२२) देवगडकडे जातांना दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. गाडीचे टायर फुटल्यामुळे गाडी दुसऱ्या बाजूला फेकल्या गेली. या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही.